preloader

Shree Shankarji Aarti

post

।। श्री शंकराची आरती ।।


लवथवती विक्राळा ब्रह्मांडी माळा विषे कंठ काळा त्रिनेत्री ज्वाळा ।।
लावण्य सुंदर मस्तकी वाळा । तेथुनिया जळ निर्मळ वाहे झुळझुळा ।।१।।
जय देव जय देव जय श्री शंकरा । आरती ओवाळू तुज कर्पुरगौरा ।।
जयदेव जयदेव ।।धृ.।।
कर्पुरगौरा भोळा नयनी विशाळा । अर्धांगी पार्वती सुमनांच्या माळा ।।
विभुतीची उधळण शितीकंठ निळा । ऐसा शंकर शोभे उमा वेल्हाळा ।।
जय देव ।।२।।
देवी दैत्य सागर मंथन पै केले । त्यामाजी अवचित हलाहल ते उठले ।
ते त्वां असुरपणे प्राशन केले । नीलकंठ नाम प्रसिद्ध झाले ।।
जय देव ।।३।।
व्याघ्रांबर फणिवरधर सुंदर मदनारी। पंचानन मनमोहन मुनिजनसुखकारी ।।
शतकोटीचे बीज वाचे उच्चारी । रघुकुलतिळक रामदासा अंतरी ।। 
जय देव ।।४।।