preloader

Shree Kapaleshwar Mahadev Aarti

post

|| श्री कपालेश्वर महादेवाची आरती ।।


|| श्री कपालेश्वर महादेवाची आरती ।। जय विश्वंभरणा, जय पार्वतीरमणा, जय गिरिजारमणा ।।
मदभवततिसंहारुनि दावी तवचरणा । ॐ हर हर महादेव ।।१।।
कारण ब्रह्मचि तू गा तव शक्तीमाया, प्रभू तव शक्ती माया ।।
स्वेच्छेने लीलेस्तव करीसी जनकार्या । ॐ हर हर महादेव ।।२।।
आद्यंतादि विकारशून्या चैतन्या, प्रभू शून्या चैतन्या ।
जगी बनूनी किती करिसी क्रीडा जगमान्या । ॐ हर हर महादेव ।।३।।
उत्पत्ती स्थिती नाशन करण्या अवतरला, प्रभू तू करण्या अवतरला ।
ब्रह्मा विष्णू महेश्वर रूपे तै स्तविला । ॐ हर हर महादेव ।।४।।
दुष्टशते संहारुनी, धर्मा रक्षियले । प्रभू त्वा धर्मा रक्षियले ।।
भक्त्युद्रके दासा सर्वस्वा दिधले । ॐ हर हर महादेव ।।५।।
तुजसि अवमानुनि दक्षे मख केला। प्रभू दक्षे मख केला ।
टाकी तव सती अग्नि कुंडी देहाला । ॐ हर हर महादेव ।।६।।
छेदुनि दक्ष शिरा त्या छागी बनवियला । प्रभू त्वा मेंढा बनविला ।।
मखध्वंसुनि त्या वीरभद्रे मिरवियला । ॐ हर हर महादेव ।।७।।
हरिनिंदक विधीमुख निज शस्त्रे छेदियले । प्रभू त्वा निज शस्त्रे छेदियले ।
तेणे श्रीहरी द्वेष्ट्या शासन सुचवियले । ॐ हर हर महादेव ।।८।।
झाली ब्रह्महत्या ऐसे सुर वदले । प्रभू ऐसे सुर वदले ।। ब्रह्मकपालासह बहू तिर्थाटन केले । ॐ हर हर महादेव ।।९।।
सहस्त्रकमले हरिने तव पूजन केले । प्रभू तव पूजन केले ।।
एकचि कमला हरूनि भक्ता पारखियले । ॐ हर हर महादेव ।।१०।।
निजनेत्रा उपटोनी तव पदि अर्पियले । हरिने तव पदि अर्पियले ।।
भक्त शिरोमणि ऐसे वदवूनि तोषविले । ॐ हर हर महादेव ।।११।।
स्वशिरा तंतु वाद्या वाजवूनि गाई। प्रभू तू वाद्या वाजवूनि गाई ।।
दशमुख निजमुख छेदुनि अर्पी तव पायी । ॐ हर हर महादेव ।।१२।।
आत्मलिंगा त्याते वश होऊनि देई । प्रभू तू वश होऊनि देई ।।
भक्तपराधीन ऐसे म्हणवूनि जगी घेई । ॐ हर हर महादेव ।।१३।
शलिक्षेत्री गोवध होता खळवळले । प्रभू मुनी सारे खळवळले ।
ब्रह्माद्रीवरी गौतम मुनिने तप केले । ॐ हर हर महादेव ।।१४।।
शरणागत वात्सल्ये गंगोदक दिधले । प्रभू त्वा गंगोदक दिधले ।।
ज्यांच्या स्नाने कितीतरी पातकी उध्दरिले । ॐ हर हर महादेव ।।१५।।
गौतमी अरुणा संगमी स्नाने अघ गेले । प्रभू स्नाने अघ गेले ।
ब्रह्मकपाली अस्थिविलयी ते पडले । ॐ हर हर महादेव १६।।
पंचवटी क्षेत्री गिरी गव्हरी मग बसला । प्रभू तू गिरी गव्हरी मग बसला ।।
वदुनि कपालेश्वर तू सकल जनै स्तविला । ॐ हर हर महादेव ।।१७।।
कर्पूरधवला गौरी शोभित वामांगा। प्रभू पार्वती शोभित वामांगा ।
पतितोध्दारिणी जटिला मस्तकी तव गंगा । ॐ हर हर महादेव ।।१८।।
त्रिशूल हस्ता नंदी सेवित पदयुगला । प्रभू सेवित पदयुगला ।।
डमरु निनादी चुंबित गणपती मुखकमला । ॐ हर हर महादेव ।।१९।।
तव तीर्थ स्नानाने बहु व्याधी टळती । प्रभू बहु व्याधी टळती ।।
बाधा जारण, मारण, उच्चाटन पळती । ॐ हर हर महादेव ।।२०।।
भूतप्रेत पिशाच्च पाहूनि थरथरती । प्रभू तूज पाहूनी थरथरती ।
देई तव सेवा बहु संतती संपत्ती । ॐ हर हर महादेव ।।२१।।
तव लिला वर्णाया शक्ति नसे नाथा । प्रभू मम शक्ति नसे नाथा ।
होई सरस्वती कुंठित गाता तव गाथा ।। ॐ हर हर महादेव ।।२२।।
भवार्तिने या तुज येवो ममकरुणा । प्रभू तुज येवो मम करुणा ।
अध हरूनि संरक्षी मज दीनोध्दरणा । ॐ हर हर महादेव ।।२३।।
जय विश्वंभरणा । जय पार्वतीरमणा । जय गिरजा रमणा ।
मदभवतती संहारक दावी तव चरणा । ॐ हर हर महादेव ।।२४।।

* मंन्नपुष्पांजली *
* महामृत्युंजय मंत्र *
* गणेश गायनी *
* शिव गायन्नी *
* ਰੀ ਗਧਰੀ *