preloader

Devi Aarti

post

|| श्री देवीची आरती ।।


दुर्गे दुर्घट भारी तुजविण संसारी । अनाथनाथे अंबे करुणा विस्तारी ।
वारी वारी जन्ममरणांते वारी । हारी पडलों आता संकट निवारी ।।१।।
जयदेवी जयदेवी जय महिषासुरमर्दिनी ।
दैत्यासुरमर्दिनी सुरवर ईश्वर वरदे तारकसंजिवनी ।।धृ।।
त्रिभुवनीभुवनी पहाता तुज ऐसी नाही ।
चारी श्रमले परंतु न बोलवे काही ।
साही विवाद करितां पडलो प्रवाहीं ।
ते तुं भक्तालागीं पावसि लवलाहीं ।। जय ।।२।।
प्रसन्नवदने प्रसन्न होसी निजदासां । क्लेशांपासुनि सोडीवी तोडी
भवपाशा अंबे तुजवाचुन कोण पुरविल आशा ।
नरहरि तल्लिन झाला पदपंकजलेशा ।। जय ।।३।।