preloader

Pankha

post

|| पंखा ।।


माया मिथ्या ब्रह्मचि सत्य। ऐसे बोलती सदगुरु नाथ ।।
उपनिशिदिनी मनी सिद्धांत। निज वस्तू करा तुम्ही प्राप्त ।।
मनी काही नका धरु शंका । भोल्यावरी वारा पंखा ।।
द्या यमपुरीला झोका । भोल्यावरी वारा पंखा ।।१।।
निज बोधाची करुनिया दांडी । विषयाची मुरडूनी मुंडी ।।
वासना समूळही खंडी । हरिदासासी कोणी ना दंडी ।।
वाहे विठ्ठल प्रेमे बुक्का । भोल्यावरी वारा पंखा ।।
द्या यमपुरीला झोका । भोल्यावरी वारा पंखा ।।२।।
सत्त्वाची झालर केली । भक्तिची मोती ओवियली ।।
वैराग्याचा वारा । त्रिगुणांची गुंफण घाला ।।
तम बुद्धी सत्वर नाशी । ऐसे पद त्यासी ।।
भोले वाचुनी न मिळे बुक्का । भोल्यावरी वारा पंखा ।।
द्या यमपुरीला झोका । भोल्यावरी वारा पंखा ।।३।।
ऐसा पंखा जो वारिला । त्रिविध ताप हारिला ।।
भावाचा रुमाल केला । मोहाचा घाम पुशिला ।।
अलक्ष लक्ष पडलो । भोले चरणी शरण मी आलो ।।
द्वैतावरी मारिला टाका । भोल्यावरी वारा पंखा ।।
द्या यमपुरीला झोका । भोल्यावरी वारा पंखा ।।४।।
शुध्द करुनिया अंतःकरण । अर्पूनिया तन मन धन ।।
लावा भोले चरणी मन । जो चुकवी जन्म मरण ।।
भोले नाम सततची घोका । भोले नाम सततची घोका ।।
भोल्यावरी वारा पंखा ।।
द्या यमपुरीला झोका । भोल्यावरी वारा पंखा ।।५।।
कर्पूरगौरं करुणावतारं संसारसारं भुजगेंद्रहारं
सदा वसंतं हृदयारविंदे भवं भवानी सहितं नमामि
ॐ कारः बिंदु संयुक्तम, नित्यम ध्यायन्ती योगिता
कामदम मोक्षदम चैव, ॐ कारः नमो नमः
ॐ नमः शिवाय
ॐ नमः शिवाय
ॐ नमः शिवाय
।। श्री कपालेश्वर महादेव की जय ।।