preloader

Ganeshji Aarti

post

|| श्री गणपतीची आरती ।।


सुखकर्ता दुःखहर्ता वार्ता विघ्नाची । नुरवी पुरवी प्रेम कृपा जयाची ।।
सर्वांगी सुंदर उटि शेंदुराची । कंठी झळके माळ मुक्ताफळांची ।।१।।
जय देव जय देव जय मंगलमूर्ती । दर्शनमात्रे मनः कामना पुरती ।।धृ.।।
रत्नखचित फरा तुज गौरी कुमरा । चंदनाची उटी कुंकुमकेशरा ।।
हिरेजडित मुगुट शोभतो बरा । रुणझुणती नुपुरे चरणी घागरीया ।।
जय. ।।२।।
लंबोदर पितांबर फणिवरबंधना । सरळ सोंड वक्रतुंड त्रिनयना ।।
दास रामाचा वाट पाहे सदना । संकटी पावावें, निर्वाणी रक्षावे सुरवरवंदना ।।
जयदेव जयदेव जय मंगलमूर्ती ।। दर्शनमात्रे मनः कामनापुरती ।।३।।